Monday, October 8, 2012

अजून काही फोटो

My favorite!


मेरी पहली कमाई!

राधाचे डॉक्टर्स !


गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही बऱ्याच डॉक्टर्स ना भेटी दिल्या.. पुण्यातला gynecologist, औरंगाबाद ची gynecologist आणि you wont believe पहिल्या 15 दिवसांमध्येच आम्ही राधाला 4 डॉक्टर्स कडे नेऊन आणल आहे.. प्रत्येक डॉक्टर ची स्वतःची एक style आहे.. आमचा पुण्यातला डॉक्टर म्हणजे total पुणेरी.. मी म्हणेल ती पूर्व दिशा.
मी : "डॉक्टर नक्की काय झालाय, कशामुळे त्रास होतोय नक्की तिला?"
डॉक्टर : "काही नाही, या गोळ्या घ्या , बर वाटेल!" (मी काय खेडेगावातून आलेला अडाणी माणूस आहे का?)
मी: "पण डॉक्टर नक्की diagnoses काय  आहे?"
डॉक्टर : "ती काळजी मी करतो.. गेली 35 वर्ष मी तेच करतोय.. तुम्ही फक्त औषध घ्या ! "
या डॉक्टर चा IT मध्ये काम करणाऱ्यांवर विशेष जीव (का राग?)... त्याच्या मते IT मध्ये काम करणारी आई म्हणजे बळावर प्रचंड अन्याय!!! सुवर्णाला प्रत्येक appointment ला विचारायचा. "मग? बंद केल ना कामावर जाणं?" आणि वर "सोडून द्या ती नोकरी" असा उपदेश..
एकदा सुवर्णाने काही symptoms नेट वर सर्च केली आणि वर या डॉक्टर ला सांगितलं "मी internet वर चेक केल " म्हणून .. झालं! आम्हाला इतकी बोलणी बसली त्यादिवशी..मी हे असलं काहीतरी सर्च करायच्या भानगडीतच पडत नाही ... almost सगळी लक्षणं heart trouble कडे इशारा करत असतात आणि डॉक्टर म्हणतात "gases झालेत"...
वरून कितीही blunt वाटत असला, तरी आतून त्याला patients ची काळजी वाटते हे जाणवायचं पण.. सुवर्णा delivery साठी औरंगाबाद ला जाणार हे कळल्यावर त्याने बऱ्याच सूचना दिल्या.. गाडी हळू चालवा, वाटेत halts घ्या.. आणि म्हणाला "delivery झाल्यावर एक call करा, कसं आहे तुमच बाळ ते कळवा.." सुवर्णाने पण आठवणी ने call केला त्याला..
औरंगाबाद मध्ये सुवर्णाच्या आईच्या ओळखीच्या डॉक्टर होत्या.. त्या आणि त्यांची मुलगी दोघीही gynecologist. सुवर्णाला जी due date  दिली होती त्यावेळी senior डॉक्टर परदेश दौऱ्यावर होत्या.. त्यांची मुलगी, hardly 30-32 years of age... अतिशय मृदुभाषी. या डॉक्टर ची पण एक गम्मत आहे.. हिची पहिली solo delivery patient म्हणजे अपर्णा, सुवर्णाची बहिण.. त्या वेळेसही तिची आई available नव्हती.. हिला tension आलं. काही problem आला कि हि आईला phone करून विचारायची! "आई , आता  काय करू?"..
सुवर्णाची पण तिने मस्त काळजी घेतली.. तिचा आश्वासक आवाज ऐकला कि सगळ tension विरघळून जायचं, सुवर्णाचे हजार प्रश्न असायचे, पण ती न कंटाळता उत्तरं द्यायची..
जगातली सगळ्यात जास्त विश्वासाची नाती असतात त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर आणि पेशंट च नातं. आजच्या commercial जगात पण असे आपुलकीने हे नातं जपणारे डॉक्टर्स आहेत हे आपल भाग्यचं!