Sunday, September 23, 2012

Photos

Radha in playful mood!
Zop!

नजर

सासूबाई: बाळाला अस नका ठेऊ, त्याचे पाय दक्षिणेकडे होतात.
बाळाला आंघोळ घालणाऱ्या मावशी : आवो अस सारक सारक बाळाकड बगू नका! आपलीच दिरीष्ट लागतीया!

असे एक न अनेक संवाद सध्या घरात चालू आहेत. मुलांच्या जन्माभोवती आपण गैरसमजांच घट्ट जाळ विणून ठेवलेलं आहे.. मागच्या post मध्ये अशाच एका गैरसमजुती बद्दल मी लिहील होत, कि ज्यामुळे मला सांगितलच गेल नाही कि सुवर्णा ला OT मध्ये नेत आहेत.. अशीच अजून एक समजूत कि ५  दिवस होईपर्यंत बाळाला नवीन कपडे घालायचे नाहीत.. राधाकडे फक्त एकच झबल होत.. कुणाच तरी जुन मागून आणलेलं.. दुसऱ्या दिवशी तर तेही धुवून वाळत टाकल्यामुळे राधाला नुसताच गुंडाळल होत दुपट्यात.. हे असे समज काय कामाचे? मग त्या दिवशी सुवर्णाच्या cousin ने काही जुनी झबली आणि दुपटी आणून दिली.. मी नवीन आणलेले कपडे पाचव्या दिवसानंतरच घालण्यात आले..
बाळाच्या जन्माबरोबर येणारा अजून एक प्रकार म्हणजे "सोयर"! बाळाच्या कुटुंबीयांनी जन्मानंतर काही दिवस देव पूजा करायची नाही, देवाच दर्शन घ्यायचं नाही etc .. घरात इतकी शुभ घटना घडली असताना पण हे असे समज का रूढ झाले its beyond me! 
अशा अजून बऱ्याच समजुती आहेत.. पहिले ५ दिवस बाळाचा फोटो काढायचा नाही.. बाळंतीनीच्या room  मधले सगळे आरसे कापडाने झाकून ठेवायचे.. रूम च्या खिडक्या चुकून पण उघडायच्या नाहीत वगैरे वगैरे..आता next month मध्ये राधाचे कान टोचायचेत म्हणे .. तो इवलासा जीव, already सगळ्या  vaccination च्या injections मधून तर सुटका नाही, वर हे...
पहिले ३ दिवस राधाने अज्जिबात त्रास नाही दिला.. रात्री पण अगदी शहाण्या मुलीसारखी झोपायची.. पण एक दिवस मात्र अज्जिबात झोपायला तयार नाही, सारखी कुरकुरत होती.. खाली ठेवलं कि रडायची.. मांडीवर घेतलं कि जरा शांत, पण झोप नाहीच.. आई बाबा आज्जी रात्रभर जागे.. आज्जी म्हणाली बरेच जण येऊन गेले न भेटायला , नजर लागली लेकराला कुणाची तरी.. मी पण मग मनातल्या मनात हात जोडले देवाला.. माझ्या राधाच रक्षण कर वाईट नजरेपासून! आणि आईना म्हणालो "आई काजळ लावतात न हो बाळाला नजर लागू नये म्हणून? उद्या आंघोळ झाली कि आठवणीने लावा!"

Wednesday, September 19, 2012

प्रथमोध्याय:

राधा आज ५ दिवसांची झाली.. बेड वर पडून मस्त खेळतायत madum . खेळता खेळता मधेच गोड हसतेय राधा.. आणि सगळा शीण सरल्यासारख वाटत .. गेले almost १० महिने कायम ताण होता मनावर.. कस असेल आपल बाळ? कस दिसेल ? कस हसेल? डॉक्टर चे visits , सोनोग्राफी, वर ९ महिन्यात दोनदा admit पण कराव लागल होत.. राधा ... नाव आधीच ठरवलं होत मी.. एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली मुक्ता बर्वे ची राधा देसाई गाजत होती, पण मला त्यच्या आधी पासूनच वाटत होत हेच नाव ठेवाव..
आणि गम्मत म्हणजे, मुलगी झाली तर राधा हे fix होत.. पण मुलाच नावच ठरत नव्हत , आम्ही seriously  चालू केलेला मुलाच्या नावाचा शोध, कायम कोणत्या तरी कॉमेडी नावापाशी येऊन थांबायचा ... आणि आम्ही दोघ वेड्यासारखे हसत सुटायचो.. एका site वर मुलाच्या नावासाठी suggestions  होती ... रमणीमोहन , रजनीकांत :):) आवरा!
मागचे ५ दिवस तर sollid eventful होते.. मी शुक्रवारी सुवर्णाला नेहमी प्रमाणे office ला पोचल्यावर call केला.. तेंव्हा सुवर्णा हॉस्पिटल मध्ये होती.. तिला just OT  मध्ये नेणार होते.. पण फोन वर
मी: काय चाल्लय? आज जरा उशीर झाला फोन करायला.
सुवर्णा : हो का? मी छान आहे .. काही विशेष नाही (!). मीटिंग नाहीये का तुला? (इतर वेळी फोन करायला ५ मिनिट जरी उशीर झाला तरी ५ missed  calls आणि ६ SMS असतात...)
मी : आहे ना.. आता ५ मिनिट मध्ये..
सुवर्णा : बर मग मीटिंग करून घे, मग बोलू.. (सुवर्णा सुधारली !!)

हे सगळ १०:३० ला झाल .. १२:३० ला pops चा call , "मुलगी झाली.. अभिनंदन!!" .. मी अवाक! नवऱ्याला कळाल तर delivery ला जास्ती त्रास होतो अशा समजुती मुळे हे सगळ कारस्थान होत..:) ..
मी अशक्य स्पीड ने, हातातल्या काम handover केल आणि शिवाजीनगर गाठल.. आता पुणे ते औरंगाबाद हा 6 तासांचा प्रवास होता.. हा wait मात्र असह्य झाला.. इतके दिवस नकळत याच क्षणाची वाट पाहत होतो.. आनंद , anxiety, relief  सगळं एकाच वेळी दाटून आल होत..
आणि हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर दिसलं .. सुवर्णाच्या चेहऱ्यावर पण exactly हेच mixture होत.. 
गेल्या वर्षभराची तप:शर्या फळाला आली होती .. राधा आईच्या कुशीत हात पाय हलवत मस्त पहुडली होती!