Sunday, April 30, 2023

आज मैं उपर, आस्मां नीचे

आपल्या अपत्याने काहीतरी अचिव केल्यावर येणारी feeling काही औरच.. I am so proud of you Radha!!! भरतच्या रंगमंचावर पाच पन्नास लोकांसमोर न घाबरता जो काही परफॉर्मन्स दिलयास तू, कमाल! Natyashibirat admission घेताना खर तर फार काही अपेक्षा नव्हत्या माझ्या, वेगळा अनुभव मिळावा तुला हा एकमेव उद्देश होता... उणपुर पंधरा दिवसांच शिबिर, त्यात पहिला week तर exam ची तयारी. परफॉर्मन्स ची विशेष तयारी झालीच नसणार.. त्यामुळे काहीच अपेक्षा न ठेवता auditorium मध्ये स्थानापन्न झालो.. पण entry pasun शेवटच्या घंटे पर्यंत flawless performance दिला सगळ्या मुलांनी... तुझे चिडल्याचे हावभाव, खणखणीत आवाजात बोललेला पहिला डायलॉग... सहज सुंदर डान्स.. अटक मटक चवळी चटक, चला करूया नाटक बिटक.... आणि कळस म्हणजे सुंदर कौसल्येचा राम च गाणं. जिंकलस तू राधा. अभिमानानं उर भरून आला ! किती मन लाऊन केली होतीस तयारी, किती उत्साहाने न चुकता 12 च्य उन्हात रोज गाठला होतास क्लास... अजून काय पाहिजे राधा, कुठलीही गोष्ट करशील आयुष्यात याच उत्साहाने याच तन्मयतेने कर, यशापयश आपल्या हातात नसतंच कधी, पण तरी मनापासून प्रयत्न करायची शिकवण या शिबिरातून मिळाली असेल तर ही सुट्टी खरंच सत्कारणी लागली असे म्हणावं लागेल. आज खूप खूप proud वाटतंय, जमेल ते कर, जमेल तसं कर.. पण मनापासून 

No comments:

Post a Comment