Sunday, September 23, 2012

नजर

सासूबाई: बाळाला अस नका ठेऊ, त्याचे पाय दक्षिणेकडे होतात.
बाळाला आंघोळ घालणाऱ्या मावशी : आवो अस सारक सारक बाळाकड बगू नका! आपलीच दिरीष्ट लागतीया!

असे एक न अनेक संवाद सध्या घरात चालू आहेत. मुलांच्या जन्माभोवती आपण गैरसमजांच घट्ट जाळ विणून ठेवलेलं आहे.. मागच्या post मध्ये अशाच एका गैरसमजुती बद्दल मी लिहील होत, कि ज्यामुळे मला सांगितलच गेल नाही कि सुवर्णा ला OT मध्ये नेत आहेत.. अशीच अजून एक समजूत कि ५  दिवस होईपर्यंत बाळाला नवीन कपडे घालायचे नाहीत.. राधाकडे फक्त एकच झबल होत.. कुणाच तरी जुन मागून आणलेलं.. दुसऱ्या दिवशी तर तेही धुवून वाळत टाकल्यामुळे राधाला नुसताच गुंडाळल होत दुपट्यात.. हे असे समज काय कामाचे? मग त्या दिवशी सुवर्णाच्या cousin ने काही जुनी झबली आणि दुपटी आणून दिली.. मी नवीन आणलेले कपडे पाचव्या दिवसानंतरच घालण्यात आले..
बाळाच्या जन्माबरोबर येणारा अजून एक प्रकार म्हणजे "सोयर"! बाळाच्या कुटुंबीयांनी जन्मानंतर काही दिवस देव पूजा करायची नाही, देवाच दर्शन घ्यायचं नाही etc .. घरात इतकी शुभ घटना घडली असताना पण हे असे समज का रूढ झाले its beyond me! 
अशा अजून बऱ्याच समजुती आहेत.. पहिले ५ दिवस बाळाचा फोटो काढायचा नाही.. बाळंतीनीच्या room  मधले सगळे आरसे कापडाने झाकून ठेवायचे.. रूम च्या खिडक्या चुकून पण उघडायच्या नाहीत वगैरे वगैरे..आता next month मध्ये राधाचे कान टोचायचेत म्हणे .. तो इवलासा जीव, already सगळ्या  vaccination च्या injections मधून तर सुटका नाही, वर हे...
पहिले ३ दिवस राधाने अज्जिबात त्रास नाही दिला.. रात्री पण अगदी शहाण्या मुलीसारखी झोपायची.. पण एक दिवस मात्र अज्जिबात झोपायला तयार नाही, सारखी कुरकुरत होती.. खाली ठेवलं कि रडायची.. मांडीवर घेतलं कि जरा शांत, पण झोप नाहीच.. आई बाबा आज्जी रात्रभर जागे.. आज्जी म्हणाली बरेच जण येऊन गेले न भेटायला , नजर लागली लेकराला कुणाची तरी.. मी पण मग मनातल्या मनात हात जोडले देवाला.. माझ्या राधाच रक्षण कर वाईट नजरेपासून! आणि आईना म्हणालो "आई काजळ लावतात न हो बाळाला नजर लागू नये म्हणून? उद्या आंघोळ झाली कि आठवणीने लावा!"

No comments:

Post a Comment